Tiranga Times Maharastra —
साऊथ सुपरस्टार थलपती विजयचा चेन्नई एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विजय एअरपोर्टवर पोहोचताच चाहत्यांनी एकच गर्दी केली. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो प्रवास करत असताना ही घटना घडली. चाहत्यांच्या गर्दीत विजयचा तोल ढासळला आणि तो धडपडताना दिसला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच सुरक्षारक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत विजयला उचलून कारमध्ये बसवलं. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांसह नेटकरीही अस्वस्थ झाले असून, स्टार्सच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
