India–US Relation च्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांविरोधात वाढत्या आक्षेपार्ह वक्तव्यांची चर्चा सुरू आहे. काही निर्णयांमुळे भारत–अमेरिका संबंधांवर तणाव निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात असताना, एका अमेरिकी पत्रकाराने केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
Tiranga Times Maharastra यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये 2026 मध्ये अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांबाबत द्वेष वाढू शकतो, अशी वादग्रस्त टिप्पणी करण्यात आली होती. भारतीय समुदाय, त्यांचे व्यवसाय आणि धार्मिक स्थळांबाबतही आक्षेपार्ह उल्लेख केल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
या पोस्टनंतर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर संबंधित पोस्ट हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
.
