Tiranga Times

Banner Image

WPL 2026: आरसीबीला मिळणार थेट अंतिम फेरीचं तिकीट! या संघात एलिमिनेटरसाठी लढत

आरसीबी थेट अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर उभी असताना, उर्वरित संघांमध्ये एलिमिनेटरसाठी जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: January 20, 2026

Tiranga Times Maharastra

 

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. साखळी फेरीतील बहुतांश सामने पार पडले असून आता अंतिम फेरी आणि एलिमिनेटरचं गणित स्पष्ट होऊ लागलं आहे. आतापर्यंत 12 सामने पूर्ण झाले असून गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

सध्या दिल्ली कॅपिटल्स वगळता उर्वरित चार संघांनी प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. दिल्लीने चार सामने खेळले असून उर्वरित सामने अजून बाकी आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत एकूण आठ सामने खेळणार आहे.

स्पर्धेच्या नियमानुसार

गुणतालिकेतील अव्वल संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार

दुसरा आणि तिसरा संघ एलिमिनेटर सामना खेळणार

आरसीबीचं वर्चस्व कायम

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला संघाने यंदाच्या मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यांमध्ये आरसीबीने विजय मिळवला आहे.

आरसीबीच्या खात्यात सध्या 10 गुण असून उर्वरित तीन सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला तरी थेट अंतिम फेरीचं तिकीट निश्चित होणार आहे. कारण 12 गुणांपर्यंत इतर कोणत्याही संघाला पोहोचणं जवळपास अशक्य ठरणार आहे.

एलिमिनेटरसाठी चुरस

आरसीबी अव्वल स्थानी असली तरी एलिमिनेटरची लढत मात्र चांगलीच रंगतदार ठरणार आहे. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात दुसऱ्या व तिसऱ्या स्थानासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे.

प्रत्येक सामना आता ‘करो किंवा मरो’ ठरत असून एका पराभवाने थेट एलिमिनेशनचा धोका निर्माण होत आहे.

चाहत्यांसाठी थरारक शेवट

स्पर्धेचा शेवटचा टप्पा अत्यंत रोमांचक ठरण्याची चिन्हं आहेत. 

Breaking News:

Recent News: