कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मानल्या जाणाऱ्या कल्याणमध्ये तब्बल 38 वर्षांची साथ सोडत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. घराणेशाही, दुर्लक्ष आणि निष्ठावंतांची गळचेपी यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या घडामोडीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
