Tiranga Times Maharastra —
अभिनेता आमिर खान याची दुसरी पत्नी आणि प्रसिद्ध फिल्ममेकर किरण राव हिच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. किरण राव हिच्यावर 12 MM डायमीटर अपेंडिक्सची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या तिची तब्येत स्थिर आहे. रविवारी किरणने स्वतः सोशल मीडियावर रुग्णालयातील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये रुग्णालयाबाहेरील दृश्य, हातावर लावलेला रुग्ण टॅग आणि उपचारानंतरची स्थिती दिसून येते. चाहत्यांकडून तिच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
किरण राव यांच्या प्रकृतीत सुधारणा असून अपेंडिक्स शस्त्रक्रियेनंतर त्यांनी स्वतः रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना दिलासा दिला.
