2025 मध्ये सेलिब्रिटी विश्वात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या असून अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्याबाबतच्या चर्चांनीही जोर धरला होता. काही दिवसांपासून गोविंदाच्या अफेअरच्या अफवांमुळे घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्व चर्चांवर आता सुनीता आहुजा यांनी स्वतः प्रतिक्रिया देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुनीता यांनी सांगितले की गोविंदाच्या आयुष्यात एका महिलेशी संबंधित चर्चा होत्या, मात्र त्या नात्यात खरे प्रेम नव्हते आणि ते आर्थिक कारणांपुरते मर्यादित होते, असा दावा त्यांनी केला. याआधी घटस्फोटाच्या सर्व अफवा त्यांनी फेटाळून लावल्या असून, या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा गोविंदाचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलं आहे. – Tiranga Times Maharastra
गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर पत्नी सुनीताचा खुलासा, नात्यामागे प्रेम नव्हे तर पैशांचं कारण असल्याचा दावा.
