आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. दोन भावांमध्ये मनोमिलन झाले असून २३ तारखेपूर्वी या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महायुतीचं टेन्शन वाढण्याची चिन्हे असून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
