राज्यात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून बुलढाणा आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांनी हळहळ व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे कार झाडावर आदळून तीन मित्रांचा मृत्यू झाला, तर पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे ट्रक आणि कारच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातांमध्ये एकूण चार तरुणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर अचानक काळाचा घाला आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
