Tiranga Times Maharastra
राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होत असून कुठे कडाक्याची थंडी तर कुठे मुसळधार पावसाचं चित्र दिसत आहे. मॉन्सून संपून महिने उलटले असतानाही पावसाने अनेक भागांत माघार घेतलेली नाही. 1 जानेवारीलाही काही प्रदेशांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून थंडीचा कडाका जाणवत असून उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे गारठा वाढत आहे. अनेक जिल्ह्यांत तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज असून काही भागांत पावसासह ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
