Tiranga Times Maharastra
वूमन्स प्रीमियर लीग 2026 च्या चौथ्या मोसमात शनिवारी रंगणार्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं विशेष लक्ष लागलं आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्ससमोर पुन्हा एकदा यूपी वॉरियर्सचं आव्हान असणार आहे.
या मोसमातील आपला पाचवा सामना मुंबई इंडियन्स 17 जानेवारी रोजी खेळणार आहे. विशेष बाब म्हणजे सलग दुसऱ्यांदा मुंबईसमोर यूपी वॉरियर्स उभी ठाकणार आहे. मागील सामन्यात यूपीने दमदार खेळी करत सलग दोन विजय मिळवलेल्या मुंबईला पराभूत केलं होतं आणि या मोसमातील पहिला विजय साजरा केला होता.
त्या पराभवानंतर आता मुंबई इंडियन्सकडे जोरदार पुनरागमन करण्याची मोठी संधी आहे. तिसरा सामना जिंकून पुन्हा विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी मुंबई पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, यूपी वॉरियर्स पुन्हा एकदा मुंबईवर वर्चस्व गाजवणार का, हा मोठा प्रश्न आहे. यूपीचा आत्मविश्वास सध्या उंचावलेला असून मुंबईविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरेल.
