Tiranga Times

Banner Image

BJP : कुणाला भोवळ, तर कुणाचा आक्रोश; उमेदवारी न मिळाल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयासमोर हायहोल्टेज ड्रामा

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. उमेदवारी वाटपावरून उफाळलेली ही नाराजी भाजपसाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र आहे.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: December 30, 2025

Tiranga Times Maharastra

 

महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म दाखल करण्यास अवघे काही तास उरले असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उमेदवारी नाकारण्यात आल्याने संतप्त इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांनी थेट भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.

महायुती तुटल्यानंतर अनेक निष्ठावंतांना सहज तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी तिकीट कापल्याचे समोर येताच नाराजीचा उद्रेक झाला. काही महिला उमेदवारांना आंदोलनादरम्यान भोवळ आली, तर काही इच्छुकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने परिस्थिती अधिकच चिघळली.

काही वॉर्डांमध्ये उमेदवारी नाकारल्याने इच्छुक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भावनिक प्रसंग पाहायला मिळाले. दीर्घकाळ पक्षाशी एकनिष्ठ राहूनही डावलण्यात आल्याचा आरोप करत अनेकांनी पक्ष नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त केली. घोषणाबाजीमुळे वातावरण चांगलेच तापले होते.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. उमेदवारी वाटपावरून उफाळलेली ही नाराजी भाजपसाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र आहे.

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: