पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून युतीबाबत हालचाली सुरू झाल्या असून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या संदर्भात अजित पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवू शकतात का, याची शक्यता सध्या तपासली जात आहे. राज्यात महायुती असली तरी पुण्यात स्थानिक राजकारणामुळे वेगळे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युतीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मुंबईत सविस्तर चर्चा केली जाईल, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
