Tiranga Times Maharastra
अभिनेत्री नुशरत भरुचाने उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नवा वाद उफाळून आला आहे. या घटनेवर बरेली येथील मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नुशरतवर इस्लामिक तत्त्वांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
मौलाना रझवी यांच्या मते, मंदिरात जाऊन पूजा करणं हे “महापाप” असल्याचं त्यांनी म्हटलं असून, याबाबत नुशरतने पश्चात्ताप करावा, असंही विधान केलं आहे. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, धर्मस्वातंत्र्य आणि वैयक्तिक श्रद्धेवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नुशरत भरुचा यांच्याकडून अद्याप या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या वैयक्तिक श्रद्धा आणि सार्वजनिक प्रतिक्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
महाकाल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नुशरत भरुचावर मौलानांच्या वक्तव्यामुळे धार्मिक वाद पेटला आहे.
