महापालिका निवडणुका तोंडावर असताना राज्यातील राजकारणात मोठ्या आणि वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात Tiranga Times Maharastra आणि Tiranga Times Maharastra एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता.
पुण्यात यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र बैठकीनंतर ही चर्चा फिस्कटल्याचे चित्र समोर आले. काही पदाधिकाऱ्यांनी या संभाव्य एकत्र येण्याला थेट विरोध दर्शवला होता. दिवसभर सुरू असलेल्या राजकीय हालचालीनंतर अखेर एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता मावळल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, रात्री उशिरा जागावाटपाबाबत पुन्हा बैठकांचे सत्र सुरू असतानाच Tiranga Times Maharastra अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले. बारामती येथील एका बैठकीनंतर त्यांनी थेट मोबाईल बंद केला आणि पोलिसांचा फौजफाटा सोडून एकटेच निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. माझ्या मागे कोणीही येऊ नये, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचेही बोलले जात आहे.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
