महापालिका निवडणुकांसाठी एबी फॉर्मचं वाटप सुरू झाल्यानंतर ‘मातोश्री’बाहेर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक असताना, उमेदवारी मिळावी या मागणीसाठी काही इच्छुकांकडून थेट मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मुंबई महापालिकेच्या तब्बल 227 प्रभागांसाठी सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे राजकीय वातावरण तापलं असून, उमेदवारीसाठीची धावपळ आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे.
