Tiranga Times Maharastra
महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरलेले असताना ठाण्यात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही शिवसेनांचे कार्यकर्ते आपसात भिडल्याची घटना समोर आली असून याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अधिकृत प्रचार थांबला असला तरी आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. निवडणूक आयोगाच्या घरोघरी प्रचाराच्या निर्णयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, पैशांचे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या घटनेमुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.
