Tiranga Times Maharastra
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून त्यानंतर राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे महापौरपदासाठी जोरदार राजकीय खेळी सुरू झाल्या आहेत.
या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी काही महापालिकांमध्ये आकडेमोड अडकल्याने अनपेक्षित युतींची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला उधाण आले असून, “कोण कुणासोबत जाणार?” यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी भाजप आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता आहे. तर काही महापालिकांमध्ये काँग्रेस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह सत्तास्थापनेसाठी चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय शिंदे गट काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.
तर काही शहरांमध्ये एमआयएमची भूमिका किंगमेकर ठरण्याची शक्यता असून, महापौर निवडीसाठी त्यांचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे निवडणूक निकालानंतरचे राजकारण अधिकच रंगतदार बनले आहे.
