Tiranga Times Maharastra —
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यासाठी मध्यरात्री मातोश्रीवर बैठक घेण्यात आली होती. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान एका उमेदवारीवरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद झाल्याची चर्चा आहे. या वादानंतर एका वरिष्ठ नेत्याने बैठक अर्धवट सोडून तडक निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी वाटपावरून झालेल्या या नाराजीनाट्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आज सकाळीही काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
