Tiranga Times

Banner Image

BMC Election : मुंबई महापालिकेचा पुढचा महापौर कोण? संदीप देशपांडेंच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी मतदारांची भूमिका काय राहणार आणि या मुद्द्याचा निकालावर किती परिणाम होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: December 30, 2025

Tiranga Times Maharastra

BMC Election : मुंबई महापालिकेचा पुढचा महापौर कोण? संदीप देशपांडेंच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईच्या महापौर पदावरून मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईचा पुढचा महापौर हा मराठीच असेल आणि तो ठाकरेंच्या विचारांचा असेल, असा निर्धार त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी अस्मिता आणि महापौर पदाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्रचारादरम्यान बोलताना संदीप देशपांडे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत मुंबईवर परप्रांतीय महापौर लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महापालिका निवडणुकीत हा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी मतदारांची भूमिका काय राहणार आणि या मुद्द्याचा निकालावर किती परिणाम होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: