Tiranga Times Maharastra —
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असताना, एका पक्षाकडून मात्र एबी फॉर्म वाटपाबाबत अजूनही स्पष्टता नसल्याची चर्चा आहे. इतर पक्षांनी उमेदवार जाहीर करून एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी संबंधित पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार, एबी फॉर्म कधी दिले जाणार याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. यावर बोलताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने माध्यमांशी संवाद साधत सांगितले की, ही निवडणूक देश, महाराष्ट्र, मुंबई आणि विशेषतः मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
