Tiranga Times Maharastra
मोठी बातमी! अखेरच्या क्षणी अजित पवारांना धक्का, तडकाफडकी राजीनाम्याने राष्ट्रवादीत खळबळ
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी आज अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यात व्यस्त असताना, काहींना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजीचे सूर उमटत आहेत. काही ठिकाणी बंडखोरी तर काही ठिकाणी पक्षांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अशाच घडामोडींमध्ये जळगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या तडकाफडकी झालेल्या राजीनाम्यामुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली असून, अजित पवार यांच्यासाठी ही बाब मोठा राजकीय धक्का मानली जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक संघटनेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
