Tiranga Times Maharastra
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाचा “कावााला (Kaavaalaa)” हा गाण्याने यूट्यूबवर इतिहास रचला आहे. या गाण्याने 100 कोटींपेक्षा जास्त (1 बिलियनहून अधिक) व्ह्यूज मिळवत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
हे गाणं तमन्नाच्या ‘जेलर (Jailer)’ या सुपरहिट चित्रपटातील असून रजनीकांत यांच्यासोबत तिच्या दमदार डान्समुळे हे गाणं जगभरात प्रचंड व्हायरल झालं होतं. गाण्यातील तिची स्टाइल, एक्सप्रेशन्स आणि खास हुक स्टेप सोशल मीडियावर ट्रेंड ठरली.
रिलीज झाल्यानंतर भारतासह परदेशातही हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि डान्स कव्हर्समुळे “कावााला” हे गाणं आजही लोकांच्या पसंतीस उतरलेलं दिसत आहे.
