iranga Times Maharastra
यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत इमारतीतील अनेक मजल्यांना आग लागली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर तातडीने बचावकार्य राबवण्यात आले आणि सुमारे 40 रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. संबंधित इमारतीत एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचेही निवासस्थान असून, त्यांच्या घरालाही आगीचा फटका बसल्याची माहिती आहे. मात्र, ते स्वतः सुरक्षित असल्याचे समजते.
आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
#TirangaTimesMaharastra
#MumbaiNews
#Andheri
#FireIncident
#BreakingMarathiNews
#CityUpdates
