राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षासाठी दिलासादायक आणि उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे. मतदानाला अजून काही दिवस बाकी असतानाच भाजपच्या विजयाचा नारळ फुटला असून, पक्षाचा सलग दुसरा उमेदवार विजयी ठरल्याची माहिती समोर आली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभर मोठी लगबग पाहायला मिळाली. अनेकांना एबी फॉर्म न मिळाल्याने नाराजी व्यक्त झाली, काहींनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला तर काहींनी पक्षांतर केल्याचंही चित्र दिसून आलं. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपने विजयाची नोंद करत राजकीय आघाडी घेतली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच सलग दुसरा विजय मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून, आगामी निवडणुकांसाठी पक्षाचा आत्मविश्वास वाढल्याचं चित्र आहे.
bjp-second-consecutive-win-mahanagarpalika-election
महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच भाजपच्या सलग दुसऱ्या विजयाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
