Tiranga Times Maharastra
राज्यात राबवण्यात येत असलेली लाडकी बहीण योजना सध्या जोरदार चर्चेत असून आता या योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ नियमात न बसणाऱ्या लाभार्थ्यांनी, विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं उघड झालं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा १५०० रुपये जमा केले जात होते. मात्र योजनेच्या अटी व निकषांची योग्य तपासणी न करता अनेक अर्ज मंजूर झाल्याचं आता समोर येत आहे. त्यामुळे शासनाकडून सध्या अर्जांची छाननी सुरू असून अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात येत आहेत.
या छाननीदरम्यानच मोठ्या गैरप्रकारावरून पडदा उठला असून, लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.
ladki-bahin-yojana-corruption-government-employees-benefit
लाडकी बहीण योजनेत नियमबाह्य लाभार्थ्यांना फायदा मिळाल्याचं उघड झाल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
