Tiranga Times

Banner Image

अभिनेत्री तारा सुतारियाचा मुंबईतील एका कॉन्सर्टमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे

व्हायरल झालेल्या कॉन्सर्ट व्हिडीओवर तारा सुतारियाने स्पष्टीकरण देत कटकारस्थानाचा आरोप केला आहे.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: December 31, 2025

Tiranga Times Maharastra

. प्रसिद्ध गायक एपी ढिल्लोच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान घडलेला हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही क्षणांतच व्हायरल झाला.

कॉन्सर्टदरम्यान तारा सुतारियाने एपी ढिल्लोला मिठी मारली आणि गालावर किस केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर एपी ढिल्लोनेही तिला मिठी मारत किस करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. या सगळ्या घटनेदरम्यान ताराचा बॉयफ्रेंड वीर पहारिया उपस्थित होता आणि त्याच्या प्रतिक्रियांवरूनही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल झाले.

या वादावर आता अखेर ताराने मौन सोडलं आहे. तिने सोशल मीडियावर संपूर्ण व्हिडीओ शेअर करत स्पष्ट भूमिका मांडली. काही सेकंदांचा कापलेला क्लिप मुद्दाम व्हायरल करून माझं करिअर आणि वैयक्तिक नातं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तिने केला आहे. हा क्षण चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचं सांगत, संपूर्ण सत्य लोकांसमोर यावं म्हणून तिने पूर्ण व्हिडीओ शेअर केल्याचं म्हटलं आहे.

 

 

 

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: