Tiranga Times

Banner Image

U19 World Cup : बांगलादेशविरुद्धही आता नो हँडशेक पॉलिसी! नाणेफेकीवेळी घडला धक्कादायक प्रकार

u19-world-cup-india-vs-bangladesh-no-handshake-toss-controversy-2026
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: January 17, 2026

Tiranga Times Maharastra

 

अंडर-19 वनडे वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना सुरू होण्याआधीच मोठा वाद पाहायला मिळाला. नाणेफेकीवेळी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमेकांशी हस्तांदोलन न करता मैदानावर तणावाचं वातावरण निर्माण केलं.

सामन्याचा टॉस बांगलादेशने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र टॉसच्या क्षणी घडलेल्या घटनेने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि बांगलादेशचा उपकर्णधार जवाद अबरार हे दोघेही मैदानावर उपस्थित होते, पण त्यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं.

दोन्ही कर्णधारांनी हँडशेक न केल्यामुळे भारत-बांगलादेशमधील वाढता राजनैतिक आणि क्रिकेटमधील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. हा क्षण पाहून प्रेक्षकही काही काळ आश्चर्यचकित झाले.

विशेष म्हणजे बांगलादेशचा नियमित कर्णधार अझीमुला हकीम प्लेइंग इलेव्हनमध्ये असतानाही नाणेफेकीसाठी उपकर्णधाराला पाठवण्यात आलं. हा निर्णय देखील चर्चेचा विषय ठरला आहे.

 

 

 

 

Breaking News:

Recent News: