कोलकाता येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की भारत हे एक हिंदू राष्ट्र असून यासाठी कोणत्याही घटनात्मक मान्यतेची किंवा कागदोपत्री पुराव्याची आवश्यकता नाही. भागवत यांनी या कार्यक्रमात हिंदू राष्ट्राची संकल्पना, संविधानातील तरतुदी आणि संघाची कार्यपद्धती यावर सविस्तर भाष्य केले.
