2025 हे वर्ष सेलिब्रिटी विश्वासाठी भावनिक चढउतारांनी भरलेले ठरले. एकीकडे अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवी सुरुवात केली, तर दुसरीकडे काही लोकप्रिय जोडप्यांच्या नात्यांना तडा गेला. काहींचे ब्रेकअप झाले, तर काहींची लग्नंही मोडली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला.
या वर्षातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं ब्रेकअप म्हणजे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचं. जवळपास दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये असलेली ही जोडी लग्नाकडे वाटचाल करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या ब्रेकअपमागचं नेमकं कारण समोर आलं नसून, तमन्ना आणि विजय दोघांनीही यावर सार्वजनिकपणे भाष्य करणं टाळलं आहे. या घटनेने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आणि 2025 मधील सर्वात चकीत करणाऱ्या नातेसंबंधांच्या तुटींपैकी एक म्हणून या ब्रेकअपकडे पाहिलं जात आहे. – Tiranga Times Maharastra
2025 मध्ये काही सेलिब्रिटींच्या नात्यांना पूर्णविराम, तमन्ना-विजयचा ब्रेकअप ठरला सर्वात चर्चेतला.
x
