. जागावाटपावरून चर्चा सुरू असतानाच भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या एका बड्या नेत्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री झालेल्या या घडामोडीत राष्ट्रवादीचे घड्याळ बाजूला ठेवत कमळ हाती घेतल्याची चर्चा असून ‘ऑपरेशन लोट्स’चा धसका आता मित्रपक्षांनाही बसल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही फोडाफोडी महायुतीतील तणाव वाढवणारी ठरत असल्याचे दिसत आहे. – Tiranga Times Maharastra
