अजित पवार : राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? महायुतीत वाढता तणाव?
आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांची युती जवळपास निश्चित झाल्याचे चित्र आहे.
मात्र अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत स्थान मिळवताना अडचणी येत आहेत.
मुंबईत काही वादग्रस्त मुद्द्यांमुळे युतीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.
पुण्यात भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केल्याने राष्ट्रवादीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील काही महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.
“एकला चलो रे”च्या भूमिकेमुळे महायुतीत मिठाचा खडा पडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकीत कोणत्या महापालिकेत राष्ट्रवादी आपली ताकद आजमावते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
