Tiranga Times Maharastra
सामान्य नागरिक, मजूर, कामगार आणि गरजू लोकांसाठी ही सुविधा दिलासादायक ठरत असून कँटिनबाहेर रांगाच रांगा लागत असल्याचं चित्र आहे.
२५ डिसेंबर रोजी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीमध्ये अटल कँटिन योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत पाच रुपयांत संपूर्ण जेवण दिलं जात आहे. कोणीही उपाशी राहू नये, हे अटलबिहारी वाजपेयी यांचं स्वप्न होतं आणि त्याच भावनेतून ही योजना सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
पहिल्या टप्प्यात दिल्लीमध्ये ४५ अटल कँटिन सुरू करण्यात आले आहेत. काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे उर्वरित कँटिनचं काम प्रलंबित असून लवकरच आणखी ५५ कँटिन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कँटिनमध्ये स्वच्छ, पौष्टिक आणि घरगुती चवीचं जेवण दिलं जात असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
अटल कँटिन ही योजना निवडणूक जाहीरनाम्यातील महत्त्वाचा भाग असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. सध्या या कँटिनमुळे गरीब आणि गरजू वर्गाला मोठा आधार मिळत असून समाजात सकारात्मक प्रतिसाद उमटताना दिसत आहे.
atal-canteen-five-rupees-meal-delhi
