Tiranga Times Maharashtra
. निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना एकत्र लढणार अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे करत थेट राजकीय कचाकच सुरू केला. त्यामुळे निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार देवाणघेवाण पाहायला मिळाली.
महापालिकेच्या एकूण 115 जागांसाठी भाजप, शिंदे सेना, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएम यांच्यात थेट लढती झाल्या. अनेक प्रभागांमध्ये बंडखोरीचा फटका प्रमुख पक्षांना बसल्याचं चित्र आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमत कोणालाही मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
आता निकालानंतर मात्र चित्र बदलण्याची शक्यता आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप आणि शिंदे गटाला सत्ता स्थापन करायची असल्यास परस्पर सहकार्याबरोबरच एखाद्या छोट्या पक्षाचा किंवा अपक्षांचा आधार घ्यावा लागू शकतो. त्यामुळे “निवडणुकीपूर्वी भांडण आणि निकालानंतर गळ्यात गळे” अशीच राजकीय समीकरणं छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
