Tiranga Times Maharastra
एअर प्युरिफायरला ‘वैद्यकीय उपकरण’ घोषित करून जीएसटी कमी करण्याची मागणी; दिल्ली उच्च न्यायालयात PIL
दिल्लीतील गंभीर वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एअर प्युरिफायरला “वैद्यकीय उपकरण” म्हणून घोषित करून त्यावरील वस्तू व सेवा कर (GST) १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे.
याचिकेनुसार, सध्याच्या प्रदूषणस्थितीत एअर प्युरिफायर ही ऐषआरामी वस्तू नसून आरोग्यासाठी अत्यावश्यक उपकरणे बनली आहेत. मात्र उच्च जीएसटी दरामुळे ती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
यामुळे सुरक्षित व स्वच्छ घरगुती हवा मिळण्याचा नागरिकांचा मूलभूत हक्क बाधित होत असल्याचा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर होणार आहे.
