Tiranga Times Maharashtra
पुण्यात पार पडलेल्या एका खास मुलाखतीदरम्यान अभिनेत्री गिरीजा ओकने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाटक आणि चित्रपटांविषयी प्रश्न विचारला. “तुम्ही नाटकं किंवा चित्रपट पाहता का?” या प्रश्नावर सुरुवातीला फडणवीस यांनी अलीकडे फारशी नाटकं पाहायला मिळत नसल्याचं सांगितलं. त्यावर गिरीजाने मिश्किल टोला लगावत, “नाटकं बघताय तुम्ही, पण ती आम्ही केलेली नाहीत,” असं म्हटलं. यावर फडणवीसांनीही तितक्याच हसतखेलत अंदाजात, “नाटकं बघतोय आणि करतोयही… आता काय सांगू?” असं उत्तर दिलं. त्यांच्या या उत्तराने गिरीजासह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि हा क्षण सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आला आहे.
