Tiranga Times Maharastra
आरोपींनी स्वतःला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याचं भासवत एका ६८ वर्षीय महिलेची तब्बल ३.७१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
ठगांनी आपण केंद्रीय तपास यंत्रणेशी संबंधित अधिकारी असल्याचं सांगत महिलेला धमकावलं. इतकंच नाही तर तिची तथाकथित ऑनलाइन चौकशी आणि कोर्ट सुनावणीही घेतली गेली. या सगळ्या दबावाखाली महिलेकडून मोठ्या रकमेचे व्यवहार करून घेण्यात आले.
या प्रकरणाचा तपास करत असताना सायबर क्राईम शाखेने गुजरातमधून एका आरोपीला अटक केली असून, संपूर्ण टोळीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून अशा प्रकारची फसवणूक केली जात असल्याने नागरिकांनी सतर्क राहावं आणि कोणत्याही अनोळखी कॉल्स, व्हिडीओ कॉल्स किंवा धमक्यांना बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
digital-arrest-scam-mumbai-woman-cheated-gujarat-link
