डोनाल्ड ट्रम्प यांची तडकाफडकी घोषणा, भारताला बसणार जबर फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाने ग्रीन कार्ड लॉटरी प्रोग्राम तात्काळ रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
मुख्य मुद्दे
ट्रम्प यांनी ग्रीन कार्ड लॉटरी प्रोग्राम सस्पेंड करण्याचा निर्णय अमेरिकेतील नुकत्याच घडलेल्या ब्राउन आणि एमआयटी विद्यापीठातील गोळीबाराच्या घटनांनंतर घेतला.
या गोळीबाराच्या आरोपींपैकी एक ग्रीन कार्ड लॉटरी प्रोग्रामचा लाभार्थी असल्याचा दावा अमेरिकेकडून केला गेला.
या निर्णयामुळे भारतासह इतर देशांतील हजारो लोकांच्या अमेरिकेत स्थलांतराचे स्वप्नांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
याआधी ट्रम्प प्रशासनाने भारतावर एच1बी व्हिसा नियम बदलले, शुल्क वाढवले, आणि टॅरिफसारखे निर्णय घेतले, ज्यामुळे भारताला आर्थिक व इमिग्रेशन क्षेत्रात धक्का बसला होता.
