महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आज जोरदार पक्षप्रवेश झाला असून नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस तसेच ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच घडलेल्या या घडामोडींमुळे विरोधी गोटात खळबळ उडाली असून शिंदे गटाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या इनकमिंगमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. – Tiranga Times Maharastra
