Tiranga Times Maharastra
मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल धावणार आहे. २६ जानेवारीपासून ही सेवा सुरू होत असून दररोज १४ फेऱ्या असणार आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेप्रमाणेच आता हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही गर्दी, उकाडा आणि धक्काबुक्कीपासून दिलासा मिळणार आहे. या एसी लोकलमुळे हार्बर मार्गावरील दैनंदिन प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
