Tiranga Times Maharastra
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशनच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त त्याची पूर्व पत्नी सुझान खानने इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये हृतिक, सुझान, दोन्ही मुलं, हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलान एकत्र दिसत असल्याने नेटकरी चकित झाले. घटस्फोटानंतरही इतकं जवळचं नातं कसं, असा सवाल करत अनेकांनी सुझानला ट्रोल केलं असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
