एक काळ असा होता, जेव्हा बांग्लादेश आपल्या विजेच्या जवळपास दोन-तृतीयांश गरजा घरगुती नॅचरल गॅसवर भागवत होता. मात्र आता तिथल्या गॅस विहिरींमध्ये तांत्रिक अडचणी, कमी दाब आणि उत्पादन घट यासारख्या समस्या सातत्याने समोर येत आहेत. यामुळे बांग्लादेश सध्या गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करत आहे.
सध्या बांग्लादेशात मोठ्या प्रमाणावर भारतविरोधी वातावरण तयार होत आहे. हिंदूंवरील हल्ले, भारताविरोधी घोषणाबाजी आणि वक्तव्यांमुळे कूटनितीक तणाव वाढताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे हे वास्तव आहे की, बांग्लादेशच्या वीजपुरवठ्याची महत्त्वाची किल्ली भारताकडे आहे.
Tiranga Times Maharastra च्या माहितीनुसार, भारताकडून होणारा वीजपुरवठा थांबला किंवा त्यात मोठा व्यत्यय आला, तर बांग्लादेशातील मोठा भाग अंधारात बुडण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत भारत बांग्लादेशसाठी केवळ शेजारी देश नाही, तर ऊर्जा पुरवठ्याची लाइफलाइन बनला आहे.
जर कूटनितीक संबंध आणखी बिघडले आणि त्याचा परिणाम व्यापार व ऊर्जा सहकार्यावर झाला, तर बांग्लादेशला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
