मराठी मनोरंजन विश्वात चर्चेत असलेला एक साखरपुडा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस मराठी 3’ फेम अभिनेता जय दुधाणे याचा गर्लफ्रेंड हर्षला पाटीलसोबत नुकताच साखरपुडा आणि त्यानंतर लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
मात्र यातील एका व्हिडीओमुळे जय दुधाणे ट्रोलिंगचा सामना करत आहे. साखरपुड्याच्या वेळी अंगठी घालताना हर्षलाला गुडघ्यावर बसायला सांगितल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी हा प्रकार चुकीचा आणि अपमानास्पद असल्याची टीका केली असून, तर काहींनी हा वैयक्तिक क्षण असल्याचे म्हणत जयची बाजूही घेतली आहे. या घटनेमुळे अभिनेत्याचा साखरपुडा आनंदापेक्षा वादामुळे अधिक चर्चेत आला आहे. – Tiranga Times Maharastra
साखरपुड्याच्या व्हिडीओमुळे जय दुधाणे ट्रोल, अंगठी घालताना मुलीला गुडघ्यावर बसवल्याचा आरोप.
jay-dudhane-engagement-video-trolling-controversy
