Tiranga Times Maharastra
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते जितेंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंबई उपनगरातील चांदिवली परिसरातील बालाजी आयटी पार्कमधील व्यावसायिक मालमत्ता जितेंद्र आणि तुषार कपूर यांनी जपानच्या NTT ग्रुपला तब्बल 559 कोटी रुपयांना विकली आहे. याआधी अंधेरीतील जमीन 855 कोटींना विकल्यानेही ते चर्चेत होते. या मोठ्या व्यवहारांनंतर जितेंद्र कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची चर्चा रंगली आहे. शांतपणे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जितेंद्र यांची गणना आता बॉलिवूडमधील श्रीमंत व्यक्तींमध्ये होऊ लागली आहे.
