Tiranga Times Maharastra
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ मधील अनिका या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री केतकी कुलकर्णी हिने सरत्या 2025 वर्षाबद्दल मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या आहेत. 2025 हे वर्ष आपल्यासाठी शिकवणीचं ठरलं, असं केतकी म्हणाली.
केतकीच्या मते, हे वर्ष तिच्यासाठी पूर्णपणे बदल घडवणारे ठरले. “जानेवारी ते जुलै या काळात मी एक वेगळी व्यक्ती होते, पण जुलैनंतर माझ्यात खूप मोठा बदल झाला. आज जी मी आहे, ती मला अधिक आवडते,” असं ती सांगते.
तिने पुढे म्हटलं की, 2025 या वर्षाने मला आयुष्याचे मोठे धडे दिले. हे धडे मी आयुष्यभर सोबत ठेवणार आहे. अनुभवांनी, चुका आणि शिकवण्यांनी हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं, असंही केतकीने स्पष्ट केलं.
नवीन वर्षाबद्दल बोलताना, 2026 हे अधिक सकारात्मक, शांत आणि स्वतःसाठी अर्थपूर्ण असेल, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली आहे.
ketaki-kulkarni-2025-life-lessons
‘कमळी’ फेम अभिनेत्री केतकी कुलकर्णीने 2025 या वर्षाला आयुष्य बदलणाऱ्या शिकवणींचं वर्ष असल्याचं म्हटलं आहे
