Tiranga Times

Banner Image

मुंबई महापालिका निवडणूक 2026 चे निकाल जाहीर होत असून खार–वांद्रे परिसरातील वॉर्ड क्रमांक 93 ते 98 कडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलं आहे

#ElectionResults2026 #BMCResults #KharBandra #MumbaiPolitics #WardResults #MaharashtraNews
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: January 16, 2026

Tiranga Times Maharashtra

. या भागात पारंपरिक मतदारसंघ, पक्षीय वर्चस्व आणि स्थानिक मुद्द्यांमुळे यंदाची लढत अधिक चुरशीची ठरली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही हे वॉर्ड प्रतिष्ठेचे मानले जात आहेत.

2017 च्या महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 93 मधून शिवसेनेच्या रोहिणी कांबळे यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसच्या प्रियतमा यांचा पराभव करत तब्बल 7,200 हून अधिक मतांच्या फरकाने बाजी मारली होती. रोहिणी कांबळे यांना 9,986 मतं मिळाली होती, तर काँग्रेस उमेदवाराला केवळ 2,748 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. हा निकाल त्या काळात एकतर्फी मानला गेला होता.

मात्र 2026 मध्ये राजकीय समीकरणं बदलली असून खार-वांद्रे भागात बहुकोनी लढत पाहायला मिळत आहे. वॉर्ड क्रमांक 94 ते 98 मध्येही प्रमुख पक्षांनी ताकद लावली असून प्रत्येक फेरीत आघाडी बदलण्याची शक्यता आहे. मतमोजणी जसजशी पुढे जाईल तसतसे खरे चित्र स्पष्ट होणार असून, या भागातील निकाल मुंबई महापालिकेच्या एकूण सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव टाकू शकतात.

 

 

 

 

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: