Tiranga Times Maharastra
कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसवर मध्यरात्री दरोड्याची गंभीर घटना घडली आहे. किणी गावाजवळील भुताचा माळ परिसरात 7 ते 8 दरोडेखोरांनी बस अडवून चाकूचा धाक दाखवत प्रवाशांकडील मौल्यवान ऐवज लुटल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या दरोड्यात सुमारे सव्वा कोटी रुपयांची चांदी, सोने आणि इतर वस्तू लुटण्यात आल्या आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांकडून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
