मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत मतदान व मतमोजणी होणार असून, सत्तेसाठी सर्वच पक्षांमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आज कागदपत्रांची छाननी होणार आहे.
मात्र तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी तीव्र असंतोष पाहायला मिळाला. काही युती आणि आघाड्यांमध्ये जागावाटप बदलल्याने अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळू शकली नाही. यामुळे राज्यभरात गोंधळ, वाद, आंदोलनं आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाले.
कुठे तिकीट न मिळाल्याने अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं, तर कुठे अपक्ष उमेदवारी दाखल करत थेट बंडाचा मार्ग स्वीकारण्यात आला. काही ठिकाणी उमेदवारीची कागदपत्रं देण्याच्या पद्धतीवरूनही वाद निर्माण झाले. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काही कार्यकर्त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याचंही चित्र दिसून आलं.
या सगळ्या घडामोडींमुळे महानगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या दिवशी राज्यात राजकीय नाट्य आणि अस्वस्थ वातावरण निर्माण झालं होतं.
#MunicipalElection
#MaharashtraPolitics
#TicketDistribution
#PoliticalDrama
#TirangaTimesMaharastra
