Tiranga Times Maharashtra
. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने तब्बल डबल सेंच्युरी पार करत राज्यभरात भक्कम आघाडी घेतली आहे. या निकालांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचं वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
या निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसल्याचं दिसत असून, मनसेपेक्षा एमआयएमला अधिक जागा मिळाल्याचं पहिल्या कलांमधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे शहरी भागातील मतदारांचा कल एमआयएमकडे वळल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. अनेक महापालिकांमध्ये हे पक्ष पिछाडीवर आहेत. तुलनेत एकनाथ शिंदे गटाची शिवसेना अनेक ठिकाणी आघाडीवर असून सत्तास्थापनेच्या शर्यतीत दिसत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, भाजपच्या या यशामागे मजबूत संघटन आणि नेतृत्वाची मोठी भूमिका आहे. या निकालांचा परिणाम येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवरही दिसण्याची शक्यता आहे.
