राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वातावरण तापले आहे.
काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे.
या निवडणुकांमध्ये अध्यक्ष व सदस्यपदांसह एकूण १४३ जागांसाठी मतदार आपला कौल देणार आहेत.
यापूर्वी २ डिसेंबर रोजी बहुतांश नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले होते.
उद्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आहे.
शांतता व सुरळीत मतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.
२ डिसेंबर आणि सध्याच्या टप्प्यातील मतदानाचा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर होणार आहे.
राज्यभरातील राजकीय पक्षांचे आणि नागरिकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
