हवामान अपडेट : पुढील ७२ तास महत्त्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा
मागील काही दिवसांपासून राज्यासह देशभरात हवामानात सतत बदल जाणवत आहेत.
महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने काही भागांमध्ये थंडीची लाट जाणवते आहे.
येत्या काळात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असली, तरी थंडी पूर्णपणे कमी होणार नसल्याचा अंदाज आहे.
उत्तर भारतातील वाढलेल्या थंडीचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असून शीत लहरी तीव्र झाल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने पुढील ७२ तास सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
देशातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता असून दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची स्थिती कायम आहे.
हवामानातील या बदलांमुळे वायू प्रदूषणातही वाढ झाली असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
कधी थंडी तर कधी पाऊस अशा बदलत्या हवामानामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
